तालुका
अलिबाग तालुक्यातील राजमाळा येथे विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला
रायगड जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग
रायगड जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील राजमाळा येथे विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. गीता जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. मानसी ताई दळवी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी अर्पणा शिंदे आदी मान्यवर व विभागातील महिला उपस्थित होत्या.



