महाड महापुराबद्दल आमदार भरतशेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक

मयूर महाडिक – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आमदार भरतशेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली, यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले कि शासनाने लवकरात लवकर महाड तालुक्यातील शहरातील छोटे / मोठे व्यवसाय करणाऱ्यांना मोबदला देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, शासनाच्या घालून दिलेल्या अटी व शर्थी कमी करण्याची मागणी या वेळी केली आणि भावे येथे धरण झाल्यास पुराचा धोका हि कमी होईल.

महाड शहरात येणारे पुराचे पाणी आणि त्यामुळे होणारे नुकसान या गोष्टीवर विचार विनिमय करून उपाययोजना करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले, सदर बैठकीला उपस्थित नगराध्यक्ष स्नेहलताई जगताप, रायगड जिल्हा अधिकारी कल्याणकर साहेब, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक दुधे साहेब, महाड प्रांत पुदलवाड मॅडम, तहसीलदार काशीद साहेब आणि सदर मिटींग साठी संबंधित अधिकारी रस्ते विकास महामंडळ, कोकण रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विभागाचे मुख्य अभियंता, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, परिवहन विभाग, खारभूमी विभागमंडळ, एम एम ए अध्यक्ष, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, महाड नियंत्रण समितीचे सदस्य आणि व्यापारी वर्ग आदी उपस्थित होते.




