तालुका
भागेश बांद्रे या युवकाने रा.जि. परिषद शाळेमध्ये वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तु यांचे केले वाटप
नितेश पवार – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड : महाड तालुक्यामधील बिरवाडी वेरखोले या गावातील भागेश बांद्रे या तरुणाने आपला वाढदिवस रा.जि. परिषद शाळेमधील विद्यार्थी यांसोबत साजरा करण्याचे ठरविले.

यासाठी वळण विभागतील रायगड जिल्हा परिषद दापोली या शाळेची निवड करून तिथे अतिशय सुंदर रित्या वाढदिवस साजरा करून 1 ते 8 वी च्या विद्यार्थी यांना वहया व शालेय उपयोगी वस्तुचे वाटप केले.
विद्यार्थी आणि शिक्षक यांनी भागेश बांद्रे या तरुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आभार देखील मानले.
यावेळी रायगड जिल्हा परिषद दापोली या शाळेचे मुख्याध्यापक वैभव भोंदरे सर आणि सर्व शिक्षक वर्ग, पत्रकार नितेश पवार, तरुण – अनुज पवार, विशाल मोरे, सुनील जाधव, सागर पवार आणि गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते.



