जिल्हा

सावित्री नदी व अनुषंगिक नद्या व उपनद्यातील गाळ यांत्रिक पध्दतीने काढण्याच्या ई-लिलाव प्रक्रियेस प्रथम मुदतवाढ

 

सतिश मेहता – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड दि.11 :- रायगड जिल्हयातील सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी, रेवदंडा खाडी व सावित्री नदी, बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी, राजपूर खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील ड्रेजरद्वारे उत्खननासाठी सन 2023-24 साठी राखीव असलेल्या रेती उपगटाचा जाहिर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रीयेद्वारे दि. 28 जून 2023 ते दि. 5 ऑगस्ट 2023 वाळू लिलाव या कालावधीत आयोजित करण्यात आलेला असून याबाबत दै.पुण्यनगरी, दै.प्रहार या वृत्तपत्रात दि. 28 जून 2023 रोजी व जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या http://mahatenders.gov.in तसेच www.raigad.gov.in संकेतस्थळावर दि.28 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यापैकी परिशिष्ट् 1 मधील डेपो क्रमां 2,8, व 9 करीता प्रत्येकी तीन निविदा प्राप्त झाल्याने ते वगळून शिल्लक असलेल्या वाळू डेपो क्रमांक 1,3,4,5,6,7 हे फेर निविदेसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे. हा लिलाव कालावधी दि.05 ते दि.12 ऑगस्ट 2023 या कालावधीकरिता राहील, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी रायगड मनोज मेश्राम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!