महाडमध्ये दंगल नियंत्रण पथकाने घेतली रंगित तालीम
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड दि. 27 गणशेत्सोवाच्या पार्श्व भूमीवर महाड उपविभागातील चार पोलीस ठाण्याच्या पोलिसांची दंगल नियंत्रणाची रंगित तालिम क्रांती स्तंभाजवळ घेण्यात आली. या रंगित तालिममध्ये माणगाव येथील आर.सी.पी युनिटचे जवानही सहभागी झाले होते.
महाडचे उपविगिय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या रंगित तालीममध्ये महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे, तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.प्रदीप देशमुख, पोलादापूर पोलीस ठाण्याचे सहा. पो.नि. श्री.म्हसकर आणि रायगड पोलीस दलाच्या राखीव पोलीस विभागाचे उपनिरिक्षक श्री.शेख यांच्यासह चार पोलीस ठाण्याचे पोलीस आणि आर.सी.पी. प्लॅनचे जवान या रंगीत तालीमीत सहभागी झाले होते. या तालमी दरम्यान अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
गणेशोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, घडल्यास तो प्रकार हाणून पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश जावा यासाठी ही तालीम घेण्यात आली.



