जिल्हा
ठाण्यात ढगफुटीसदृश पाऊस; तासाभरात 71 मिमी पावसाची नोंद तर मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
मितेश महाले – सहसंपादक
ठाणे, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. नवी मुंबई, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडतोय. संध्याकाळीअचानक आलेल्या पावसाने कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगली तारांबळ उडाली आहे. ठाणे शहराला तर पावसाने चांगलेच झोडपले आहे. संध्याकाळी साडे पाच ते साडे सहा या एक तासात 71 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात दौलत नगरमध्ये 85.9 मिमी, नौपाडा 84 मिमी, कोपरी 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे.



