तालुका

21 ते 23 जानेवारी दरम्यान एम.एम.ए महोत्सव 2023 चे आयोजन

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

महाडः- महाड उत्पादक संघटनेच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने 21 ते 23 जानेवारी असे तीन दिवस एम.एम.ए महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नृत्य आणि गायन स्पर्धेबरोबरच, रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, फनी गेम्स, खाद्य जत्रेचा आनंद महाडकरांना लुटता येणार आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील समर्थ रामदास विद्यालयाच्या मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  21 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता या महोत्सवाला प्रारंभ होईल. 21 जानेवारी रोजी गायन स्पर्धा, 22 जानेवारी रोजी रेकॉर्ड डान्स आणि ग्रुप डान्स स्पर्धा तर 22 जानेवारी रोजी  मँगो इव्हेंटस् प्रस्तुत म्युझिकल इव्हेंटस, ही संगिताची मैफल रंगणार आहे. यामध्ये अभिनेता अंशूमन विचारे, अक्षय  घाणेकर, ईशानी पाटणकर यांचा सहभाग असेल. संपूर्ण महोत्सवात  विविध प्रकारचे गेम्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स महाडकरांचा आनंद द्विगुणीत करणार आहेत.

या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी महाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे आणि सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष बिपीन वडगांवकर यांनी केले आहे.

या महोत्सवातील स्पर्धाती सह भागासाठी निखिल भोसले (7350004115), बिपीन वडगांवकर (9404610460), आणि अजित देशमुख (7350366777) यांच्याशी संपर्क साधावा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!