स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याला मान्यता
मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केला सन्मान
अभिजीत ढाणिपकर उपसंपादक कोकण विभाग
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याला मान्यता दिल्याबद्दल मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हेदेखील सर्वांचे स्फूर्तिस्थान आहेत, त्यामुळे त्यांची जयंती दिन सुद्धा शासकीय पातळीवर साजरा करण्याचा निर्णय राज्यातील युती सरकारने घेतला असल्याचे यासमयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाबद्दल सकल मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती देऊन त्याचा सन्मान केला. या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करताना यापुढे देखील मराठा समाजाचे प्रश्नांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाशीमच्या खासदार भावनाताई गवळी, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय म्हशीलकर, सुशांत शेलार, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे पाटील, महेश राणे, गंगाधर काळकुटे, अर्जुन जाधव, संग्राम भोसले, अनुप फंड, किसन जाधव तसेच मराठा समाज बांधव उपस्थित होते.
