महाराष्ट्र

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

विविध देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मान सोहळा

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रान्सएशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने द पिल्लर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी २०२१–२०२२ या  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सोहळा ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सचिव डॉ. संजय भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ओल्ड रॉयल मुंबई याच क्लब गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, मुंबई येथे पार पडला.

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मेजर जनरल शिशिर महाजन, एच ई ॲम्बासॅडर वलशन वेथोडी ( श्रीलंका), ओलहास अलिपबायव ( कझाकीस्थान), क्रिस हाँग( कोरिया), ब्रुनो ब्रॉंकॉर्ड ( फ्रेंच चेंबर), परेश मेहता, सतीनंदर आहुजा (जॉर्जियाझाकिया वर्डक ( अफगाणिस्तान), प्रवीण लुंकड, जे के चतुर्वेदी, उदय नाईक, उद्योजक विठ्ठल कामत, एकनाथ तांबवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसिद्ध उद्योग जक विठ्ठल कामत, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मुंबईचे डायरेक्टर जनरल संदीप खोसला, प्रसिद्ध ढोलकि वादक विजय चव्हाण, सोमय्या कॉलेज मुंबईचे प्राचार्य डॉ. एस के उकरांडे, शास्त्रज्ञ हेमंत रोहेरा, शिपिंग विभागाचे शब्बीर रंगवाला, आंतरराष्ट्रीय वाणिज्य व व्यापाराच्या तरुण प्रचारक मनप्रित सिंगनागी, प्रसिद्ध महिला तबला वादक अनुराधा पाल, आर्किटेक्चर व्यावसायिक प्रेम नाथ आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याचे उत्कृष्ट प्रास्ताविक व निवेदन डॉ. संजय भिडे यांनी केले. याप्रसंगी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँडइंडस्ट्री आणि २९ व्या वर्धापन दिना निमित्त इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या दोन आंतरराष्ट्रीय संस्थेचे व्ही आय पी पदाधिकारी व  सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!