तालुका

रोटरी क्लब महाड ने दिले विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ / वाकी बुद्रूक येथील विद्यार्थ्यांना दिल्या सायकल

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड: महाड तालुक्यातील वाकी बुद्रूक ( वडाचा माळ) येथील श्री. गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीस विद्याथ्यांचा घर ते शाळा हा प्रवास महाड रोटरी क्लबने सुसह्य केला आहे. शिक्षण घेण्यासाठी दुर्गभ भागातून आठ ते नऊ किलोमीटरची पायपीट करणाऱ्या या वीस विद्याथ्यांना रोटरी क्लबने सायकल्स उपलब्ध करुन दिल्या आहेत.

कोणत्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ तीन ते साडेतीन तास जाण्यायेण्यात वाया जात होते. वरिष्ठ सहाय्यक शिक्षक श्री. काकडे सर यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुलांचा मौलीक वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सदरहू मदत मिळावी अशी अपेक्षा रोटरी क्लब ऑफ महाड चे अध्यक्ष डॉ. चेतन सुर्वे यांच्याकडे व्यक्त केली. शाळेला भेट दिल्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रोटरी क्लब ने त्वरीत मागणीस मान्यता दिली व सायकलींचे वाटप करण्यात आले. मदत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

वरिष्ठ सहाय्यक शिक्षक श्री. काकडे सर यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुलांचा मौलीक वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सदरहू मदत मिळावी अशी अपेक्षा रोटरी क्लब ऑफ महाड चे अध्यक्ष डॉ. चेतन सुर्वे यांच्याकडे व्यक्त केली. शाळेला भेट दिल्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रोटरी क्लब ने त्वरीत मागणीस मान्यता दिली व सायकलींचे वाटप करण्यात आले. मदत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

या कार्यक्रमाला प्रेसिडेंट रो. डॉ. चेतन सुर्वे, रो. पराग भाई चांदे, रो. राहुल शेठ, रो. राजाभाऊ मेहता,रो. परेश शेठ,रो. डॉ. राहुल सुकाळे, रो. मधुभाई मेहता, प्रोजेक्ट चेअरमन रो. राजीव वनारसे रो. द्वारकानाथ गुरव रो. सचिन सुकाळे, सेक्रेटरी रो.अण्णाराय शिलवंत, ट्रेझरर रो. अक्षय आर्ते, रो. तुषार बुटाला, रो. सुधीर मांडवकर इत्यादी रोटरी मेंबर्स उपस्थित होते.

प्रेसिडेंट रो. डॉ. चेतन सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना सायकलींचा योग्य वापर करून चांगला अभ्यास करून यशस्वी व्हावे तसेच अनेक थोर पुरुष हे ही अशाच प्रकारच्या अनेक अडचणींवर मात करून आयुष्याचे ध्येय गाठतात.अशा प्रकारचे मौलीक मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे चेअरमन श्री. महेंद्र महामुणकर व वरिष्ठ सहाय्यक शिक्षक श्री. काकडे सर व इतर शिक्षक तसेच पालक यांनी रोटरी क्लबचे आभार मानले व केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!