तालुका

महाड व्यापारी असोसिएशनने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 14 महाड शहर व्यापारी असोसिएशन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर नसताना देखील त्यांनी पूर संकट समयी महाडकडे विशेष लक्ष देऊन सर्वतोपरी सहकार्य केले होते. तसेच त्यांनी कोरोना काळामध्ये व्यापारी वर्गावर शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. महाड व्यापारी असोसिएशन यांनी स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे केलेल्या मागणी नुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर व्यापाऱ्यांवरील हे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

त्याबद्दल व्यापारी असोसिएशनने एकनाथ शिंदे आणि आ. भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले. आणि व्यवसायाप्रती अशीच भावना वाढीस लागावी अशी विनंती महाड शहर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने आभार व्यक्त करताना आभार पत्राद्वारे केली आहे.

यावेळी महाड शहरात व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शहरातील बहुसंख्येने व्यापारी वर्ग यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे शहरातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!