जिल्ह्यातील हॉटेल / रेस्टॉरंट, कंपनी/ दवाखाना/शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापना चालकांनी व्यवसायानुसार Hygiene Rating/Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घ्यावे
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि. 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचाप्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागा मार्फत केले जाते. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवीदिल्ली यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या Eat Right India या कार्यक्रमांतर्गत Hygiene Rating या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हयातील विविध हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे Eat Right Campus या उपक्रमाअंतर्गत कंपनीतील / दवाखान्यातील/शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापनांनी मानांकन प्राप्त करून घेतले आहे. Hygiene Rating ही संकल्पना रेस्टॉरंट/हॉटेल या आस्थापनांसाठी व Eat Right Campus ही संकल्पना कंपनीतील/ दवाखान्यातील/ शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापनासाठी असून सदर आस्थापनांनी प्रथम eat right india या संकेतस्थळावर नोंदणीकरून अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण (अन्नव्यावसायिकांचे परवाने/नोंदणी) नियमन 2011 मधील परिशिष्ट 4 मधील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर Audit Agency कडून Audit झाल्यानंतर प्राधिकरण यांच्याकडून संबंधित आस्थापनेस मानांकन प्रमाणपत्र प्राप्त होते.
हे मानांकन प्रमाणपत्र अन्न सुरक्षा व मानदे व्यावसायिक त्यांचे व्यावसायाचे ठिकाणी प्रदर्शित करू शकतात. त्यामुळे त्यांची आस्थापनाग्राहकांना अन्न सेवनासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून निवडता येईल. रायगड जिल्ह्यातील एम. जी. एम. हॉस्पीटल, कामोठे, शंकरा आयहॉस्पीटल, पनवेल, पिल्लई कॉलेज, पनवेल व रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणे, ता. रोहा या आस्थापना मधील कॅटिनने Eat Right Campus चे मानांकन तसेच डॉमीनोझ पिझ्झा, मॅकडोनाल्ड, रॅडिसन्स ब्ल्यू, अलिबाग या आस्थापनांनी Hygiene Rating मानांकनप्राप्त करून घेतले आहे.
रायगड जिल्ह्यातील हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनीतील /दवाखान्यातील/शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापना चालकाना या प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या व्यवसायानुसार Hygiene Rating / Eat Right Campus चे मानांकनप्राप्त करून घ्यावे. त्याअनुषंगाने काही अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, रायगड–पेण यांच्याशी संपर्क साधावा, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन रायगड–पेण लक्ष्मण दराडे यांनी कळविले आहे.



