मताधिकार जागृतीसाठी लोकशाही भोंडला स्पर्धाचे आयोजन
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन यंदा मुख्य निवडणूक अधिकारीकार्यालयाने ‘लोकशाही भोंडला‘ ही स्पर्धा आयोजित केली आहे.
नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सवा महाराष्ट्रातील या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडलागीते. आपल्या लोकसंस्कृतीचं अनन्य वैशिष्ट्य असणारा हा भोंडला कुठे हादगा, तर कुठे भुलाबाई म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा भोंडला जणू स्त्रियांना त्यांची सुखदुःखं व्यक्त करण्याचं हे पारंपरिक व्यासपीठच! सासर–माहेर, तिथली प्रेमा द्वेषाची नाती हे सगळं स्त्रिया या लोकगीतांतून वर्षानुवर्ष सांगत आल्या आहेत.
देशाच्या लोकशाहीत निम्मी संख्या स्त्रियांची आहे. आणि, स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ, प्रेरणास्त्रोत असते. कुटुंबातील स्त्रीपर्यंतएखादी गोष्ट पोहोचली, तर ती फक्त तिच्यापुरती मर्यादित राहत नाही. ती संपूर्ण कुटुंबाला त्याच्यात सहभागी करून घेत असते. स्त्रीचीहीच ताकद लक्षात घेऊन ‘लोकशाही भोंडला‘ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून स्त्रिया स्वतः तर आपल्यामताधिकाराचा. लोकशाही मूल्यांचा विचार करतीलच, पण सोबत त्यांची कुटुंबंही याबाबत सजग होतील.
‘भोंडल्यांच्या गीतां‘मध्ये माहेर हे सुखाचं तर सासर कष्टाचं असतं. माहेरची नाती ओढ लावणारी तर सासरची नाती द्वेषाची असतात. माहेरात मनाजोगं स्वातंत्र्य, स्वच्छंदपणा असतो, तर सासरी बंधने, कष्ट असतात. एकूणच या गीतांमधलं माहेर गोड असतं, जिथंखायाला सापडतं; तर सासर द्वाड असतं. जे कोंडून मारतं. या लोकशाही भोंडला‘ स्पर्धेसाठी सासर–माहेरच्या जागी लोकशाही–हुकूमशाही यांची प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. काही गीतांमध्ये माहेरी जाऊ इच्छिणाऱ्यासुनेला सासू एकेक काम सांगत जाते अन् तिचं माहेरी जाण्याचं स्वप्न लांबणीवर पडतं. याच प्रकारे आधुनिक स्त्रीला कामाच्याधबडग्यात तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणं, यांसारख्या कामांत चालढकल करावीलागते. या गीतांच्या माध्यमांतून तिला यासाठी प्रेरित करणाऱ्या गीतरचना करता येतील.
लोकगीतांच्या अंगभूत लवचीक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणंही सहज शक्य आहे. आणि हे मानस गुंफताना तिच्यास्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं काव, हे सांगता येईल. लोकगीतांतील स्वीपेक्षा आजची स्त्रीस्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे. निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाणमानून गावाच्या देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे आवाहन करता येईल.
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी अधिकाधिक महिलांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सदरस्पर्धेची सविस्तर नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.
लोकशाही भोंडला स्पर्धा नियमावली—
नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव! अश्विन महिन्यातील हस्त नक्षत्रात नवरात्रोत्सव सुरू होतो. महाराष्ट्रातील या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडला गीते. आपल्या लोकसंस्कृतीचं अनन्य वैशिष्ट्य असणारा हा भोंडला कुठे हादगा, तर कुठे भुलाबाई म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा भोंडला जणू स्त्रियांना त्यांची सुखदुःखं व्यक्तकरण्याचं हे पारंपरिक व्यासपीठच! सासर माहेर, तिथली प्रेमा–द्वेषाची नाती हे सगळं स्त्रिया या लोकगीतांतून वर्षानुवर्ष सांगत आल्याआहेत.
लोकगीताचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन यंदा मुख्य निवडणूक अधिकारीकार्यालयाने ‘लोकशाही भोंडला‘ ही स्पर्धा आयोजित केली आहे. भोंडल्यांच्या गोता मध्ये माहेर हे सुखाचं तर सासर कष्टाचं असतं. माहेरची नाती ओढ लावणारी तर सासरची नाती द्वेषाची असतात माहेरात मनाजोगं स्वातंत्र्य, स्वच्छंदपणा असतो, तर सासरी बंधने, कष्टअसतात. एकूणच या गीतांमधलं माहेर गोड असतं, जिथं खायाला सापडतं तर सासर द्वाड असतं. जे कोंडून मारतं. सख्यांनो, आपल्या यालोकशाही भोंडला‘ स्पर्धेसाठी सासर–माहेरच्या जागी लोकशाही–हुकुमशाही यांची प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेषसांगायला खूपच वाव आहे. काही गोतांमध्ये माहेरी जाऊ इच्छिणाऱ्या सुनेला सासू एकेक काम सांगत जाते अन् तिचं माहेरी जाण्याचंस्वप्न लांबणीवर पडतं, याच प्रकारे आधुनिक स्त्रीला कामाच्या धबडग्यात तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्यानावात बदल करणं, यांसारख्या कामांत चालढकल करावी लागते. या गीतांच्या माध्यमांतून तिला यासाठी प्रेरित करणान्या गीतरचनाकरता येतील.
लोकगीतांच्या अंगभूत लवचीक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचं मानस गुंफणही सहज शक्य आहे. आणि हे मानस गुंफताना तिच्यास्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं व्हावं, हे सांगता येईल. लोकगीतांतील स्त्रीपेक्षा आजची स्त्रीस्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आहे. निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाणमानून गावाच्या देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असं आवाहन करता येईल.
सख्यांनो, चला तर मग यंदाचा ‘लोकशाही भोंडला‘ साजरा करू या…!
स्पर्धेची नियमावली :
1. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. 2. एकल (Solo) किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. 3. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणेभरावा: 3.1 समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. 3.2 लोकशाही, निवडणूक मताधिकार या विषयांशी संबंधितभोंडला गीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गाण्यासोबत भोंडल्याचा नाच असेल तरी चालेल. 3.3 एका स्पर्धकानेकिंवा समूहाने एकच गीत पाठवावे. 3.4 आपल्या गीताची ध्वनिचित्रफीत पाठवताना ती कमीत कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत–भारत चार मिनिटांची पाठवावी. 3.5 ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत जास्त 300mb असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफितmp४ फॉरमॅटमध्ये असावी. 4. स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर भोंडला गीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राहा धरला जाईल. 5. आपली ध्वनिचित्रफीत https://forms.gle/GeTSjHyEN९hzazH९ या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत. 5. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा. 6. दिनांक 7 ऑक्टोबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल– अ. प्रथम क्रमांक :- 11,000/ ब. द्वितीय क्रमांक :- 7,000/ क. तृतीय क्रमांक :- 5,000/ ड. उत्तेजनार्थ :- 1000 रुपयांची एकूण दहा बक्षिसे, लोकशाही, निवडणूक मताधिकार विषयाशी संबंधित साहित्य पाठविणाऱ्या सहभागीसर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल.
आलेल्या भोंडला गीतांतून सर्वोत्तम गीते निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्यासाहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्टसाहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारीकार्यालयाने कळविले आहे.
