श्रीवर्धन समुद्रकिनारी सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
श्रीवर्धन: श्रीवर्धन समुद्रकिनारी एका अज्ञात महिलेचा निवस्त्र मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीवर्धन शहरातील इंदिरानगर येथील स्मशानभूमी येथील समुद्र किनाऱ्यावर हा मृतदेह सकाळी सुमारे १० वाजल्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यातून वाहात आल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं होत. याबाबत श्रीवर्धन पोलिसांना कळवताच श्रीवर्धन पोलीस घटनास्थळी पोहचून मृत शरीराचा शववीछेदन करून पंचनामा केला. सदरची महिला कोण आहे याबाबत अद्याप ओळख पटलेली नाही. मृत महिलेच्या शरीरावरील कपडे फाटून बाजूलाच पडलेले असल्यामुळे विविध शंका बळावत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये पसरत आहेत. काही वर्षांपूर्वी याच समुद्रकिनाऱ्यावर काही आंतरावर एक महिला व तिचा छोटा मुलगा दोघांचे मृतदेह सापडले होते. त्यावेळी देखील श्रीवर्धन पोलिसांनी त्याची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र पुढील तपसात त्या दोघांचा महिलेच्या पतीकडूनच कट करून घातपात केल्याचं निष्पन्न झालं होत. त्यामुळे या महिलेचा देखील घात कि घातपात अशी शंका वर्तवली जात आहे.
श्रीवर्धन शहरात सध्या वेड लागलेले फिरस्ती यांनी संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. वेड लागलेल्या महिला पुरुष दिवसेंदिवस वाढत आहेत. हे कुठून येतात कि यांना कोण आणून इकडे सोडत याची काही माहिती नाही. या वेड लागलेल्या फिरस्ती महिला शहराच्या मुख्य रस्त्यानवरून निवस्त्र फिरत असताना नागरिकांनी अनेकदा पाहिल्या आहेत. ही महिला त्यापैकीच एक तर नाही ना? आश्या वेड लागलेल्या महिलांचा कोणी फायदा उचलून तिला अस टाकलं तर नाही नाही. अशी चर्चा श्रीवर्धनमध्ये पसरत आहे. त्यामुळे शहरात आशयप्रकारे वाढत्या वेड लागलेल्या फिरसत्यानची वेळीच चौकशी करून त्यांना ओळख पटवण्याची गरज आहे. त्याबाबत प्रसासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी देखील नागरिकांमधून केली जात आहे.



