शहर

स्वातंत्र्याचा 75 वा अमृत मोहत्सव निमित्त माणगाव विधी महाविद्यालय मध्ये जागरूकता अभियान

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक

02 ऑक्टोबर रोजी माणगाव येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत मोहत्सव निमित्त अशोक दादा साबळे विधी विद्यालय मध्ये तालुका विधीसेवा समिती माणगाव यांच्या वतीने भारत भर जागरूकता अभियान भरवण्यात आले, लॉ कॉलेज चे विध्यार्थी आणी शिक्षक मिळून जिल्हा न्यायालय माणगाव ते माणगाव बस स्थानक असे रॅली चे आयोजन करून जनजागृती करण्याचे काम विधी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी केले. तसेच 03 ऑक्टोबर रोजी अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव येथे कायदेविषयक शैक्षणिक शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माणगाव जिल्हा न्यायालय डिस्ट्रिट जज 2 माननीय प्रिया बनकर याचीप्रमुख उपस्थिती होती, तसेच बार उपाध्यक्ष मोहनजी मेहता साहेब, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष ॲड. राजीवजी साबळे, लॉकमिटीचे चेअरमन विनोद घायाळ, ॲड. सदाफ येलोकर, अशोक दादा साबळे लॉ कॉलेज प्रिंसिपल शमा फारुखी,  द.ग. तटकरे कॉलेजप्रिंसिपल खामकर, प्रोफेसर सना मॅडम, प्रोफेसर राठोड, ॲड. शिरवतकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!