तालुका

फळसगाव शरद पवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत केला जाहीर प्रवेश

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा आणि शेकाप या पक्षांचे कार्यकर्ते रोज महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. माणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम धडाडीचे कार्यकर्ते फळसगाव येथील शरद पवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यां समवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रवेश कर्त्यांच्या काही मागण्यांचा विचार करत आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांना सांगितले की तुमची जी काही उर्वरित विकास कामे असतील ती आम्ही नक्कीच 100% पूर्ण करू आणि शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगितले.

यावेळी उपतालुकाप्रमुख नितीन पवार, निजामपूर विभागाचे विभाग प्रमुख मनोज सावंत, गणेश समेळ, निजामपूर ग्रामपंचायतचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, सुरेंद्र पालांडे, समीर तेडगुरे, रामदास दाखिनकर, फळसगाव बु सरपंच सुर्वे मॅडम, या भागातील शिवसेना युवा सेना पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी सुमन गणपत जाधव पळसगाव आदिवासी वाडी यांना त्यांची कुटुंबातील कमावती व्यक्ती त्यांचे पती गणपत जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे राष्ट्रीय कुटुंब सहायता योजनेतून 20,000.00 रुपयाचे मंजुरी पत्र आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!