ब्रेकिंग

वडूज-खटाव रोडवर भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली, दुचाकीस्वार जागीच ठार

 

दशरत थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूज-खटाव रोडवर जाधव वस्तीजवळ भरधाव वेगात मोटरसायकलला चिरडत एसटी झाडावर आदळली. या भीषण अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला. एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींना साताऱ्याकडे हलवण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!