तालुका

महाडमध्ये उपोषणकर्त्या कामगारांची प्रकृती खालावली

 

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग

महाड: औद्योगिक क्षेत्रातील टाईम टेक्नोप्लास्ट या कंपनीतील कामगारांनी व्यवस्थापनाविरोधात आठ दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारी सहा कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु कंपनी प्रशासन, व्यवस्थापन तसेच कामगार युनियन यांच्यात कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कामगारांचे उपोषण सुरूच आहे.

विविध मागण्यांसाठी कारखान्यातील ३९ कामगारांपैकी आठ कामगार उपोषणाला बसले होते. त्यातील दोघांची प्रकृती या आधीच खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी ता. ११ सायंकाळी सुहास शिंदे, नीलेश महाडीक, चंद्रकांत शिंदे, विजय सोनवणे, अनंत गुरव, दिनेश नवघरे या सहा कामगारांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कामगारांच्या असंतोषाचा सामना करावा लागला, कंपनी व्यवस्थापनाविरोधात रोष प्रकट करण्यासाठी नव्याने दहा कामगार पुन्हा उपोषणाला बसले आहेत, कामगार आणि कंपनी व्यवस्थापनातील संघर्ष वाढू नये, याकरिता खबरदारी म्हणून महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व कामगारांसोबत एक संयुक्त बैठकही घेतली होती. परंतु यामध्ये सकारात्मक तोडगा निघू शकला नाही. प्रांताधिकारी बानापुरे व तहसीलदार महेश शितोळे यांनी उपोषणस्थळी कामगारांची भेट घेतली. याबाबत कंपनीचे अधिकारी कोणती प्रतिक्रिया देण्यात तयार नाहीत.

कारखान्यात सर्व स्थानिक कामगार आहेत, मात्र व्यवस्थापनाने त्यांना अन्य राज्यात बदलीचा दबाव टाकला आहे. ही बदली स्वीकारा अन्यथा नोकरी सोडा असा पर्याय कामगारांना दिला आहे. कामगारांना अशाप्रकारे अडचणीत आणून कंत्राटी कामगार नेमण्याचा कंपनीचा डाव असल्याचे सध्या कार्यरत कामगारांचे म्हणणे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!