पालघर जिल्हा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण
लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आला करण्यात
अभिजीत ढाणिपकर -उपसंपादक कोकण विभाग
किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून पर्यावरण व स्थानिकाच्या आकांक्षा लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याच्या विकासाचा समतोल साधला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्हा मुंबईपासून जवळ असल्याने उद्योग, विविध प्रकल्प यावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या हाताला काम देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिनकर पाटील उपस्थित होते.
