ब्रेकिंग

अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोहम जाधव – शहर प्रतिनिधी रोहा

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला, त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देशील सन्मानित करण्यात आले होते.

सिंधुताई सपकाळ मुळातच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकल्या होत्या, वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्नझाले होते, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाज सेवेकडे वळवले, अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती, १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात हीसंस्था सुरु झाली.

आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथआणि बेवारस मुलांना आधार दिला आणि येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या जेवण आणि कपडे व इतर सुविधासंस्थेकडून केली, शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले, आर्थिक दृष्ट्यास्वयंपूर्ण झाल्यावर या युवक आणि  युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केली, अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत आता आहेत, त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!