जिल्हाब्रेकिंग

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सावित्रीच्या लेकींचा सन्मान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केले होते आयोजन

मितेश महाले – सहसंपादक

नांदेड: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जिल्हा नांदेडच्या वतीने भारताच्या प्रथम शिक्षिका ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावित्रीच्या लेकीचं सन्मान करण्यात आला.

हा सन्मान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ग्रामीण पोलीस ठाणे, नांदेड येथे सावित्राबाई फुले यांच्या जयंती निमित्य महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पोळीचे डब्बे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. संजीवकुमार गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मा. हर्जिंदर सिंघ संधू, सचिव गोविंद तोरणे पाटील, धर्माबाद तालुकाध्यक्ष मागासवर्गीय विभाग, शिवराज कांबळे, उपाध्यक्ष कामाजी अटकोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. संयोगिता तुकडोजी आटवले, मनीषा प्रभाकरराव वंजे, वैशाली बापूराव गोंशेटवाड, अनिता बालाजी वाडीकर, पूनम रमेशराव उदगीरे, अस्विनी माधवराव मस्के, दगड गावच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी मधुकर ससाणे, वाघीच्यादूध उत्पादक सरस्वती राजू काठारे, करोना योद्धा लायन्स नेत्रालय नांदेडच्या सुजिता सुरेश भोकरे, यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!