ब्रेकिंग

ही आरपारची लढाई! सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. तर, अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला आहे. उपोषणाला 8 दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी सांगितले की, सरकारला किती वेळ द्यायचा. मला त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. सरकार गोर-गरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करू लागले आहेत. तुम्हाला तुमच्या बद्दल बोललं तर वाईट वाटतं. वेळ कशासाठी पाहिजे, आणि कुणबी प्रमाणपत्र कशाला पाहिजे हे सांगा असेही जरांगे यांनी म्हटले. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून आम्हाला अर्धवट आरक्षण नको अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली.

सरकार गरिबांवर गुन्हे दाखल करुन अन्याय करत आहे. वेळ वाढवून देणार नाही, वेळ कशाला पाहिजे असा प्रश्न त्यांनी केला. मराठा समाजाचा किती अंत बघता. मी सरकारला चर्चेसाठी बोलावलं पण आले नाही असेही त्यांनी म्हटले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!