तालुका
महाड एमआयडीसीतील शाल्कोमध्ये हजारोंची चोरी दोन आरोपींवर गुन्हा दाखल
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड एमआयडीसीतील शाल्को इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये हजारो रुपये किमतीच्या सामानाची चोरी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी रोशन लक्ष्मण कंक राहणार बिरवाडी मूळ राहणार रुपवली तालुका महाड जिल्हा रायगड व सुमित बाळाराम तांबे राहणार ढालकाठी तालुका महाड जिल्हा रायगड या दोन आरोपींवर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी शालको कंपनीच्या भिंतीवरून उडी मारून प्रत्येकी रुपये 25,000 किमतीचे दोन लोखंडी पार्ट अशी एकूण 50,000 रुपये किमतीच्या मालाची चोरी केली होती. या आरोपींवर भादवि कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.



