महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार

जन्म भूमीतील सत्कार प्रेरणादायी असे मुख्यमंत्रीयांच्या बोलण्यातून दिसून आले

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

सातारा : सातारा जिल्ह्यातील तापोळा ता. महाबळेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या यावेळी विविध मान्यवरांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यातआला, पण त्याच्या जन्मभूमीतील झालेला त्याचा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेतांना तो प्रेरणादायी ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, अतिवृष्टीमुळे तीन हेक्टर पर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभारणीवर भर देण्यात येणारआहे,  महाबळेश्वर–तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडण्यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी सत्कार प्रसंगी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!