ब्रेकिंग

महाराष्ट्रात ओमायक्रॉन JN1 चा शिरकाव, सिंधुदुर्गातील पुरुषाला लागण

 

डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक

मुंबई: कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशभरात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना इकडे महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. सिंधुदुर्गातील 41 वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनच्या जेएन1 ची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

नव्या व्हेरिएंटच्या शिरकावानंतर जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सोबतच, कोव्हिड चाचण्या वाढवण्यासंदर्भात देखील आदेश दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

केरळमध्ये बुधवार 19 डिसेंबर रोजी 292 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!