तालुका

गांधारपाले येथील रा. जि. प. शाळा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

अमृत महोत्सव सोहळा संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या आनंदात संपन्न

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : महाड तालुक्यातील ग्रामपंचायत गांधारपाले व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या ७५ वर्षे र्पूर्तिच्या सोहळ्यास गावातील प्रत्येक वाडीतून उत्स्फुर्तपणे सहकार्य मिळाले. महिला बचत गट, पालक वर्ग, माजी विद्यार्थी यांनी या सोहळ्याच्या निमीत्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेला आवश्यक भौलिक सुविधा अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी, स्मार्ट टि.व्ही, एक्वा, रायटिंग पॅड , डिजीटल घड्याळ, कंपासपेटी, इत्यादी साहीत्य माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आले.

माजी शिक्षक व महाड पंचक्रोशीतील व्यावसायिक, गावातील अनेक व्यक्तिंनी या निमित्ताने शाळेच्या विविध भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले. ७५ वर्षाच्या या कालावधीमध्ये ” गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच आमचे ध्येय हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. सामाजीक, राज‌कीय, क्रिडा, कला, सांस्कृतिक, व्याव‌सायिक अ‌से अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेवून गेले आहेत. आज ते त्यांच्या क्षेत्रात निपुण आहेत.

ही आवडते मज मनापासूनी शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा या उक्ती प्रमाणे आज देखील ही शाळा अनेक विद्यार्थ्यांना लळा लावून आदर्श विद्यार्थी घडवित आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी शाळेची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहून सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक वर्गांचे मनःपूर्वक कौतूक केले.

या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी डॉ. सुनिता चांदोरकर गटशिक्षणाधिकारी पं. स. महाड, मान, निरजा नितीन कुद्रीमोती प्रकल्प अधिकारी एनआर इस्पात अँ पावर (प्रा.लि. छत्तीसगड), गुरुवर्य ह.ब.प. आदिनाथ महाराज नवले, मान, राजन सुर्वे वरिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) पं.स.महाड, मान, स्नेहा वीरकर केंद्रप्रमुख केंद्र करंजखोल, नामदेव पवार सरपंच, सूर्मैया जोगीलकर उपसरपंच, सहदेव दौलत उतेकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, नमिता समीर बाईत व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा, माजी शिक्षक वर्ग, गावातील व पंचक्रोशीतील व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिक त्याच प्रमाणे माजी विद्यार्थी, तरुण मित्र मंडळ, पालक वर्ग, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या मनोगतात शाळेचे व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक वर्गाचे गुणगौरव केले.

या अमृत महोत्सव सोहळ्याचे संपूर्ण सूत्रसंचलन या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. प्रकाश धाटावकर यांनी केले तर आभार सौ. प्रतिभा देसाई मॅडम यांनी मानले शाळेच्या मुख्याध्यापक सौ. प्रणिता माळवदे व सह शिक्षक श्री. प्रकाश धाटावकर, सौ. प्रतिभा देसाई, सौ. सायली शहा यांचे मोलाचे योगदान लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!