ब्रेकिंग

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

गोळी मारणाऱ्याने स्वतःला पण संपवलं

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःला पण डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती समोर येत आहे. दहिसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मॉरिश नावाच्या व्यक्तीने गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून संपवलं असल्याचं समोर आलं आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गोळ्या घालणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीच्या कार्यालयाची तोडफोड केली. घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!