तालुका

महाडमध्ये नवरात्रौत्सव उत्साहात प्रारंभ

 

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड दि.26 महाड शहर आणि तालुक्यात आज नवरात्रौत्सवास भक्तीपूर्ण आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

महाड शहरासह महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये ९६ ठिकाणी दुर्गामातेची सार्वजनिक प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामध्ये महाड शहरात २५, महाड तालुक्यात २५, महाड एम.आय.डी.सी. मध्ये ४१ तर पोलादपूरत पाच ठिकाणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त महाड शहरात एका ठिकाणी, तालुक्यात दोन ठिकाणी दुर्गामातेची खाजगी (घरगुती) प्रतिष्ठापना करण्यसात आली आहे. यादोन्ही तालुक्यांमध्ये ३३ ठिकाणी सार्वजनिक तर ७ ठिकाणी घरगुती ठिकाणी दुर्गामातेच्या फोटांंची स्थापना करण्यात आली आहे.

याखेरीज महाड शहरात ४१ ठिकाणी, महाड तालुक्यात १० ठिकाणी तर महाड औद्योगिक वसाहतीमध्ये १६ ठिकाणी सार्वजनिक घट स्थापन करण्यात आलेत. पोलादपूर तालुक्यात सोळा ठिकाणी सार्वजनिक घटांची स्थापना करण्यात आली आहे.

          आज अनेक घरांमध्येही घटांची स्थापना करण्यात आली. नवरात्रौत्सवात फुलांना विशेष मागणी असल्यामुळे महाड शहरासह तालुक्यात फुलांची विशेषतः गोंड्यांच्या फुलांची आवक वाढली आहे.

         गेली दोन वर्षे कोरानामुळे सार्वजनिकरित्या नवरात्रौत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी उत्सव साजरा करण्यारील सर्व निर्बंध हटविण्यात आले असून रास गरबा खेळण्याची वेळ देखील राज्य सरकारने वाढविली आहे. त्यामुळे महाड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी गरबा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला आहे.

        नवरात्रौत्सवात देवींचे दर्शन घेण्याची, देवींच्या ओट्या भरण्याची प्रथा आहे. त्यामुळे तालुक्यातील देवींची सर्वच मंदिरे महिला भाविकांनी सायंकाळी फुलल्याचे पहावयास मिळत होते. प्रतापगड येथे भवानी मातेच्या दर्शनासाठीही आज पहिल्या दिवशी शेकडो भाविक गेले. महाड परिवहन आगाराने महाड ते प्रतापगड या विशेष फेऱ्या नवरात्रौत्सवाच्या काळात सुरू केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!