मोबाईल असोसिएशन आयोजित भव्य दिव्य व्यापारी प्रीमियर लिग चांदे क्रीडांगण महाड येथे संपन्न
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड मोबाईल असोसिएशन आयोजित भव्य दिव्य व्यापारी प्रीमियर लिग २०२४ चे पर्व २ रे याचे आयोजन महाड येथील चांदे क्रीडांगण येथे करण्यात आले होते.
या प्रीमियर लिग २०२४ पर्व २ रे याचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यांनी यावेळी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक संदीप जाधव, राहुल देवरुखकर, महाड शहर महिला संघटीका अस्मिता शिंदे, महाड शहर व्यापारी अध्यक्ष संजय मेहता, मोबाईल असोसिएशन अध्यक्ष निलेश यादव, सल्लागार सचिन चांदोरकर, स्पर्धा प्रमुख प्रवीण चांदोरकर, कुमार चंद्रकांत मेहता, निखिल शेठ, मनीष मेहता, साहिल हेलेकर, अक्षय शेट्टे, कुणाल पवार, गीतांजली पद्माकर मोरे, अक्षया हेलेकर, सोनल सचिन शिंदे, नितल पाटील, सिध्दी धुमाळ व सर्व मान्यवर उपस्थित होते.



