तालुका

रामनवमी निमित्त महाडमध्ये निघणार शोभायात्रा

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड :१७ एप्रिल रोजी रामनवमी निमित्त महाड शहरात शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती श्री रामनवमी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश पाटेकर यांनी दिली. महाड शहरातून पहिल्यांदाच ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

अलिकडेच रामनवमी उत्सव समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या वतीने शोभायात्रेचे नियोजन करण्यासाठी वीरेश्वर मंदिरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सिध्देश पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी नगरसेवक दीपक सावंत, सुनील अगरवाल यांच्यासह राजू शिंदे, कुमारभाई मेहता सिध्देश थरवळ, रोहन ढेंडवाल, रोहन पवार, ओम काळे यांच्यासह् श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवाजी चौक – पिंपळपार मार्गे राम मंदिरापर्यंत ही शोभायात्रा जाणार असून राममंदिरात सायंकाळी रात्री ९ वाजता महाआरतीने या शोभायात्रेची सांगता होईल.

महाड शहरातील श्री राम भक्तांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिध्देश पाटेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!