आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान सन २०२३ २०२४ कावळे येथे संपन्न
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजिन
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : 14 डिसेंबर 2023 रोजी महाड तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा विन्हेरे विस्तारीत कक्ष नागाव शाखेच्या वतीने कावळे महाड येथे नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागातील बचतगटातील महिला व शेतकरी यांच्या करिता आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यात आले होते.
यावेळी उपस्थित महिलाना बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर यांनी बँकेच्या विविध योजनाची माहिती दिली तसेच बचत गटाच्या महिलाना कर्ज देण्यात असल्याची माहिती त्यांनी महिलांना दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलाना सक्षम करण्यासाठी विविध व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले.
तसेच शेतकऱ्यांना देखील शेती विषयी लागणाऱ्या कर्जाची माहिती देण्यात आली, पंतप्रधान जीवन ज्योति योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पीएम किसान योजने अंतर्गत लाभ मिळणा-या शेतकऱ्यांना केसीसी कर्ज वाटप योजनांची माहिती उपस्थित सर्व शेतकन्यांना देण्यात आली. आपल्या भागात बँक आल्याने ग्राहकांनी महिला वर्ग व शेतकरी वगनि योग्य तो लाभ घेऊन बँकेला सहकार्य करून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अश्विनी येरूनकर व आभार प्रदर्श राकेश जाधव यांनी मानले.
या वेळी बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर, कॅशियर चंद्रकांत मेंगाळ, गावातील महिला प्रतीनिधी अश्विनी येरुनकर, गावातील प्रमुख व्यक्ति शांताराम झोरे, आरूण येरूनकर, राकेश जाधव, सुभाष पेरूनकर, सुवर्णा मोरे, दीप्ती कदम महिला व शेतकरी वर्ग उपस्थित होते.



