ब्रेकिंग

किल्ले रायगडावरील पायवाट दि. 23 व 24 मे 2024 रोजी बंदचे आदेश जारी

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड  

रायगड दि. 21रायगड किल्ल्यावर महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेण्याकरीता दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी सहमती दर्शविली असून हे काम दि. 23 मे व 24 में 2024 रोजी त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. याकरिता किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरीमार्गावर संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनांच्या अनुषंगाने दि. 23 व 24 मे 2024 रोजी किल्ले रायगडावरील पायवाट बंदचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

किल्ले रायगडावर यावर्षी 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दि. 06 जून 2024 व तिथीनुसार दि. 20 जून 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरीता राज्यातील मोठयाप्रमाणात नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तीं उपस्थित राहणार आहेत.

यावर्षीच्या कार्यक्रमाच्या अगोदर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी असलेला कडा हा अतिउंच असल्याने केवळ प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने मोकळे दगड काढणे शक्य आहे. हे मोकळे दगड काढीत असताना पायरी मार्गावरून होणाऱ्या पर्यटकांची पायी वाटचाल बंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होणार नाही. या कालावधीत पर्यटक,स्थानिक नागरीक पायवाटेने गड चढ-उतार होणार नाहीत याबाबत स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!