जिल्हा

वहूर जिल्हा परिषद निर्धार मेळावा दादर येथे झाला संपन्न

भाजपाचे नीच राजकारण हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही

महाराष्ट्रातील भाजपा आणि शिंदे गटाचा जनता कडेलोट करणार

चांदया पासून बांदया पर्यंत सगळे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच निवडून येणार – मा. खा. अनंत गिते

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

दादर: मुंबई शारदाश्रम विद्या मंदिर दादर येथे वहूर जिल्हा परिषद मतदार संघाचा मुंबई निर्धार मेळावा शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, महाड विधानसभा शिवसेनेच्या नेत्या स्नेहल जगताप, विधानसभा नेते नाना जगताप, महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, महाड विधानसभा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत धोंडगे, तालुका संपर्क प्रमुख नागेद्र राठोड, जिल्हा समन्व्यक सोमनाथ ओझर्डे, धनंजय देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सदानंद मांडवकर, अश्विनी घरटकर, सह संपर्क प्रमुख ऍड मंगेश हुमणे, पोलादपूर सह संपर्क प्रमुख कृष्णा कदम, पोलादपूर सह संपर्क प्रमुख ज्ञानोबा बांदल, संदेश गोठलं, मन्सूर ताज, मनोज गोडांबे, तालुका युवा सेना अधिकारी प्रफुल धोंडगे, आयोजक अमोल पवलेकर (वहूर जिप मतदार संघ संपर्क प्रमुख) ऍड विशाल गोलांबडे, वर्षा कालप, स्वाती घोसाळकर, ज्योती मनवे, तृप्ती पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मितेश नवले यानी केले, यावेळी वैद्यकीय सेवे बद्दल कृष्णा कदम आणि सौ. चौलकर यांचा अनंत गिते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपसंपर्क प्रमुख चंद्रकांत धोंडगे व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!