महाराष्ट्र
औरंगाबाद एमजीएम संस्थेचा 39 वा वर्धापन दिन मा.खा. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
औरंगाबाद येथे एमजीएम संस्थेचा 39 वा वर्धापन दिन मा. खा. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाला. महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन मा. किशोर कदम यांनी महात्मा गांधी मिशन संस्था स्थापन केली. संस्था आज 40 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, राज्याबाहेर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून एमजीएम संस्थाचे नावलौकिक आहे. एमजीएम संस्थेने संकटग्रस्तांसाठी कायम काम करत आहे. कोविड-19 मध्ये अतिशय उत्तम काम केले आहे. याबद्दल संस्थेचे धन्यवाद, नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशनच्या रुग्णालयाचे काम प्रशंसनीय आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विषयावर संस्था काम करीत आहे. संस्थेचानाव लौकिक भारता बाहेर पसरला आहे. या संस्थेच्या रोपट्याचा महावटवृक्ष झाला आहे.
