जिल्हा

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ

बंटी पाटील – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड दि.17 : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून 03 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.

नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आता सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान 05 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!