ब्रेकिंग

मुंबई-गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता, संगमेश्वरच्या धामणीमध्ये रस्ता खचल्याने भीती

 

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाल्याचं दिसतंय. त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे. आता प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर मुंबई गोवा हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे रेल्वे ब्रीजच्या जवळ संरक्षक भिंतीचं सुरू असलेल्या रस्त्याचं काम सध्या बंद आहे. डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!