राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती रायगड किल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे साजरी
स्वप्नील ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती रायगड किल्याच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी सालाबादप्रमाणे साजरी करण्यात आली, सालाबादप्रमाणे न विसरता आमदार भरतशेठ गोगावले आवर्जून उपस्थित दर्शवली.
यावर्षी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन करत जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली, या वेळी महाडच्या सभापती सिद्धी खांबे, प्रांत अधिकारी पुदलवाड, तहसीलदार काशीद साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राउळ, रघुवीरदेशमुख, राजेंद्र खातू , वंदना मोरे, पाचाड ग्रामपंचायत सरपंच, स्थानिक ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते.
सदर जयंती सोहळा हा साध्या पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने आमदार भरतशेठ गोगावले उपस्थितीत पूजा करून साजरा करण्यात आला.
यावेळी खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका जयंती समारंभासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे जिजाऊ माँ साहेबांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.



