तालुका

दारूच्या नशेत शिवीगाळ का करतोस असे विचारले असता बांबूच्या साह्याने मारून गंभीर जखमी

 

रुपेश चव्हाण – ग्रामीण प्रतिनिधी महाड

महाड : महाड मधील नाते खिंड येथे 13 जुन रोजी रात्री 11.30 वाजता देवा शंकर राठोड वय वर्ष 42 यांनी दारूच्या नशेत असून शिवीगाळ का करतोस असे विचारले असता प्रमोद गोपीनाथ पार्टे वय वर्ष 52 यांनी बांबूच्या साह्याने मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

नातेखिंड या ठिकाणी देवा राठोड आले असता प्रमोद पार्टे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, देवा राठोड यांनी विचारले तू मला दारूचे नशेत शिवीगाळ का करतोस, असे विचारले असता, प्रमोद पार्टे यांनी लाकडी बांबू घेऊन डोक्यावर, डोक्याच्या मागील बाजूस व कपाळावर जोरदार फटके दिले असून गंभीर दुखापत झाली आहे, व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

प्रमोद गोपीनाथ पार्टे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिकारी पोनि तडवी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली अधिक तपास सुरु आहे.

जखमी देवा राठोड यांच्यावर महाड मधील शासकीय रुग्णालय येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!