देश-विदेश
अंगावर शहारा आणणारी टायटॅनिकची अशी दृश्यं पहिल्यांदाच जगासमोर
विशाल मोहिते – उपसंपादक कोकण विभाग
१९१२ मध्ये बुडलेल्या सर्वात प्रसिद्ध जहाज टायटॅनिकचे अटलांटिक महासागराच्या तळाशी जाऊन घेतलेले काही 3D स्कॅन पहिल्यांदाच जगासमोर आले आहेत.
हे पहिलेच पूर्ण आकाराचे डिजिटल स्कॅन खोल समुद्रातील मॅपिंग वापरून तयार करण्यात आले आहेत. १९१२ मधल्या त्या रात्री टायटॅनिकचा अंत नेमका कसा झाला होता, याचं उत्तरं या 3D दृश्यांमधून आणखी स्पष्टपणे मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.