महाराष्ट्र

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यातील स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची घोषणा

 

अभिजीत ढाणिपकर उपसंपादक कोकण विभाग 

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यातील स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची घोषणा करण्यात आली. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी वर्षानुवर्षे दिलेल्या लढ्याला न्याय मिळाल्याचे मत व्यक्त केले.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. आमदार बच्चू कडू यांनी यासाठी कित्येक वर्षे लढा दिला. राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर या मागणीला गती आली. मात्र यावेळी कोणताही संघर्ष न करता राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याची घोषणा केली.

या नविन मंत्रालयासाठी ११२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, स्वतंत्र सचिव आणि २०६३ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच यापुढे शासनाला कोणताही मोठे निर्णय घेताना इतर विभागांप्रमाणेच दिव्यांग मंत्रालयाचे मत घेणे अनिवार्य असेल असेही यासमयी बोलताना स्पष्ट केले. दिव्यांगांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल यामुळे घडणार आहे. त्यामुळे या बांधवांनी या निर्णयाबाबत मोठ्या मनाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

गुवाहाटीमध्ये असतानाच मुंबईला फोन करून अवघ्या २४ दिवसात हे मंत्रालय सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले त्यामुळे हे सरकार गुवाहाटीला खोके देणारे सरकार नसून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी खोके देणारे सरकार असल्याचे मत त्यावेळी बोलताना व्यक्त केले. आयुष्यभर रोख्याने व्यवहार करणाऱ्याना दिव्यांग बांधवांनी खोक्याने दिलेल्या आशीर्वादाची किंमत कळणार नाही असे सांगत विरोधकांचा समाचार घेतला.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पर्यटन आणि महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, आमदार यामिनी जाधव, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे तसेच राज्यभरातून आलेले दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!