राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृहविभागाची आढावा बैठक
सुयोग जाधव – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड
माता–भगिनींची टिंगल–टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले.
या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश:
• गुन्ह्यात रिक्षांचा वापर होत असल्याने रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालून नोंदणी करताना, स्थानिक पोलिसांकडे माहिती देणे परवानाधारकाला बंधनकारक करा.
• इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
• जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणी बाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणाकरण्याचे प्रयत्न व्हावेत.
• शक्ती कायद्यातही सुधारणा करण्यावर भर दिला जाईल
• महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.

