ब्रेकिंग

श्रीवर्धन – बागमांडला बसचा साखरोणे धारवली फाट्याजवळ भीषण अपघात

अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

 

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन : 16 मे रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता बागमांडला येथून बागमांडला – कोलमांडला – आडी मार्गे श्रीवर्धन येणाऱ्या बस क्रमांक एम. एच. ०१४ बी. टी. २७३८ एस. टी. बसचा साखरोणे धारवली फाट्या भीषण अपघात झाला. त्यावेळी एस. टी. बसचे चालक महादेव खंडागळे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात होण्यापासून टाळला, रोड मधील खड्डयामुळे आणि नवीन होणाऱ्या रोडमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

सदर बसमध्ये एकूण १९ प्रवासी प्रवास करीत होते, १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे, बस चालक यांच्या प्रसंगावधानामुळे बस साखरोणे गावाच्या बाजूला
पलटी होण्यापासून वाचली, बस पलटी त्याच्या बाजूला
किमान ६० ते ७० फुट खोल दरी आहे, झालेल्या अपघाताची माहिती कळताच श्रीवर्धनचे तहसिलदार सचिन गोसावी, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक संजय पाटील, आगार प्रमुख तेजस गायकवाड, शिवसेना मुंबई संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर यांनी अपघाताची प्रत्यक्ष पाहणी करून बस मधील १५ प्रवासी यांना श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर ढवळे यांनी रुग्णाची तपासणी करून रुग्णांना योग्य तो उपचार करून रुग्णांना आपापल्या घरी रुग्ण वाहिकेने पाठविण्यात आले.

यावेळी श्रीवर्धनचे तहसिलदार सचिन गोसावी, श्रीवर्धन आगाराचे आगार प्रमुख तेजस गायकवाड, ट्राफिक इन्स्पेक्टर लांजेकर, प्रकाश डोईफोडे वाहतूक नियंत्रक, अरुण कोसबे वाहतूक नियंत्रक, संगमेश्वर स्वामी वाहक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!