सरपंच चषक विद्युत झोतातील ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत : चेतन उतेकर मित्र मंडळ संघ विजेता
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड : सुनिल कोर्पे मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक २०२२ विद्युत झोतातील ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत चेतन उतेकर मित्र मंडळ संघ विजेता ठरला तर हिदायत इलेव्हन या संघाला उपविजेते पदावर समाधान मानाव लागले. मर्यादित षटकाच्या या स्पर्धाग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवता यावे यासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
महाडची क्रिकेट पंढरी समजली जाणाऱ्या शहरातील चांदे क्रिडांगणावर या भव्य क्रिकेट स्पर्धा दि . १३ ते १५ मे दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये ५० संघाना या स्पधेत प्रवेश देण्यात आला होता. संपूर्ण स्पर्धा ही बाद पद्धतीने खेळविण्यात आली होती
या स्पर्धेच्या विजेत्या चेतन उतेकर मित्र मंडळ संघाला रोख रक्कम ५५५५५ / – आकर्षक चषक, उपविजेते हिदायत इलेव्हन बिरवाडी संघाला २५५५५ / – आकर्षक चषक, तृतीय क्रमांक लोअर तुडील १११११ / – आकर्षक चषक चतुर्थ तेलंगा संघ१११११ / – आकर्षक चषक् देऊन गौरविण्यात आले.
या स्पधेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्य योगेश पेणकर याला मालिकावीर पुरस्कर, उत्कृष्ठ फलंदाज योगेश पेणकर, उत्कृष्ट गोलंदाज विलास सुर्वे, उत्कृष्ट क्षेत्र रक्षक कमाल लोअर तुडील, सिक्सर किंग योगेश पेणकर यांना आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा युट्युबद्वारे दिपक मंडले पुणे यांनी प्रकाशित केली. अंपायर म्हणून गेली तीन दिवस मुन्ना लाले, बंटी जाधव, आप्पा धुमाळ यांनी काम पाहिले विद्युत प्रकाश योजना विजय टमके, समालोचनाच काम दिपक मांडले आणि फैजान यांनी पाहिले तरगुण लेखक म्हणून प्रथमेश सकपाळ यांनी कामगिरी पार पडली.
ही स्पर्धा यशस्वि करण्या करिता शेखर कोर्पे, मुन्ना लाले, बंटी जाधव, प्रथमेश सकपाळ, ओंकार तांबट, चैतन्य मुंदडा, दिपक जाधव आदीनी मेहनत घेतली.
गेली अनेक वर्ष सरपच सुनिल कोर्पे यांच्या वतीने महाड मध्ये विद्युत झोतात टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पहावयास मिळतो. गेली तीन दिवस या स्पर्धेचा क्रिकेट प्रेमिंनी आंनद लुटला आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर दोन वर्षा नंतर ही मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आहे.

