मौजे बोरघर जिल्हा कार्यकारिणी सदस्यासह सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : दि १९ ऑगस्ट रोजी महाड विधानसभा मतदारसंघ पोलादपूर तालुक्यातील मौजे बोरघर येथील चंद्रकांत बाळकृष्ण सनस जिल्हा कार्यकारणी सदस्य शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह बोरघर ग्रामपंचायत सरपंच बंडू विठू पारधी उपसरपंच नारायण उतेकर त्यांच्यासह ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि या पंचक्रोशीतील असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी केला आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रकांत सणस, बोरघर, बौद्धवाडी, वडघर, चांदले गवळवाडी, महादेवाचा मुरा, इत्यादी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश.
यावेळी चंद्रकांत सणस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की केवळ आम्ही शिवसेनेने या तालुक्यात आणि मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जो हजारो कोटींचा विकास कामांचा धडक लावला आहे मोठमोठे प्रकल्प येत आहेत, त्या विकास कामांचे व्हिजन पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत एवढे वर्ष शेकाप सोबत राहून जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करू न शकल्यामुळे आणि शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश न करताच आमदार साहेब आणि कळंबे साहेब यांना सदर कामे सुचवल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या कामांना सुरुवात केली आणि काही कामे पूर्ण देखील केली त्याचं उदाहरण म्हणजे आजच नळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण देखील केले ही शिवसेनेची कार्यपद्धत पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे यावेळेस प्रवेश करत्यानी सांगितले.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले आणि चंद्रकांत कळंबे यांनी प्रवेश कर्त्यांना भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले, आणि आश्वासन दिले की आपल्यावरती शिवसेना पक्षात कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही, आपली जी काही विकासकामे राहिली आहेत ती आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि तुम्हाला पक्षात सन्मानाचीच वागणूक दिली जाईल असे आश्वासन दिले.
या वेळी चंद्रकांत कळंबे, किशोरभाऊ जाधव, लक्ष्मण मोरे, खेडेकर बुवा, शहर प्रमुख सुरेश पवार, कृष्णा कदम, सतीश शिंदे, संजय मोदी, शिवसेना युवा सेनेचे तालुक्यातील आणि मुंबईतील आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



