तालुका

दाभोळ बौद्धवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांनी सुषमाताई भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला पक्ष प्रवेश 

महाड विधानसभेत आमदार भरतशेठ गोगावले यांचे इन्कमिंग सुरूच

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : वहूर पंचायत समिती गणातून दाभोल बौद्धवाडी मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळाचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मा. जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेच्या रणरागिणी सुषमाताई गोगावले व जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला.

मिलिंद जाधव, रुपेश जाधव, अशोक जाधव, शैलेश जाधव, मंगेश जाधव, नितीन जाधव, अनिकेत जाधव, राकेश जाधव, दीपक गंगाराम जाधव, किरण जाधव, प्रदीप जाधव, सुधी जाधव, अशोक जाधव, सखाराम जाधव, अविनाश जाधव, सखाराम जाधव, अनिल जाधव, यश दीपक जाधव आणि विजय मोहिते यांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.

प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात सर्वांचे स्वागत करून आपल्याला शिवसेनेत सन्मानाची वागणूक मिळेल असे आश्वासन देखील देण्यात आले.

यावेळी मा. रा.जि.प सदस्य जितु सावंत, शिवसेना महिला आघाडी महाड विधानसभा संघटिका प्रेरणा सावंत, युवासेना उपतालुका प्रमुख महाड राहुल कदम, मुजम्मील वहब माटवणकर, विजय सावंत, निलेश चिविलकर, इम्तियाज पणतावे, साजित चिपळूणकर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!