तालुका

रानभाज्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी – आदिती तटकरे

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड: दि. 15 रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी आहे. रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

पावसाळ्यात शेतामध्ये अथवा जंगलात, डोंगर-रानावर उगवणाऱ्या विविध भाज्या,वनस्पती या आरोग्यासाठी पौष्टिक असतात.त्यामुळे या भाज्यांचा आहारात समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, यासाठी कृषी विभाग,आत्मा आणि विवेकानंद रिसर्च ट्रैनिंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वरसे ग्रामपंचायत सभागृह येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

या प्रदर्शनात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले व विक्रीसाठीही रानभाज्या उपलब्ध होत्या.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कैलास वानखेडे, प्रकल्प संचालक आत्मा रायगड सतीश बोराडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा शिवाजी भांडवलकर, उपविभागीय कृषि अधिकारी माणगाव रविशंकर कावळे, प्रांताधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार रोहा डॉ. किशोर देशमुख, गट विकास अधिकारी श्रीम.शुभदा पाटील, पोलीस निरीक्षक रोहा देविदास मुपडे, तालुका कृषि अधिकारी महादेव करे, विवेकानंद संस्थेचे व्यवस्थापक सुशील रुळेकर, वरसे ग्रामपंचायत सरपंच अमित मोहिते, उपसरपंच श्रीम.पाटील ,सदस्य तसेच शेतकरी गट ,शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, महिला शेतकरी अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!