तालुका

महाडमधून प्लॅस्टिक पिशव्यांचा ८३५ किलोचा साठा जप्त

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व महाड नगर परिषदेची संयुक्त कामगिरी

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

 

महाड दि.18 केंद्र सरकारने १ जुलै पासून एकल वापराच्या प्लॅस्टिक पिशवीं वा बंदी घातली आहे. राज्य शासनानेही भापुर्वी स न २०१८ ते २०२२ पर्यंत एकल वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी घातली होती मात्र कोरोनाचे काळात शासनाची प्लासिक बंदी विरोधातील मोहीम काहीशी थंडावली होती. राज्यात झालेल्या सत्तातरानंतर प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर अंमल बजावणी करण्यास करू झाली आहे.

महाड शहर व तालुक्यात प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपण होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्या नंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या महाड उपप्रादेशिक कार्यालय व महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकचा साठा करणार्‍या महाड मधील व्यापार्‍यांचे दुकान व गोदामावर छापे मारण्यात आले. यामध्ये एका दुकानदाराकडून ८३५ किलो प्लॉस्टिक पिशव्यांचा माल जप्त केल आहे.

प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाचे निर्देश असतानाही महाड मधील काही व्यापाऱ्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा येत होता. महाड नगर परिषदेच्या वतीने शहरात दवंडी देऊन प्लॅस्टिक वापर, विक्री, साठा करू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतरही प्लॅस्टिक पिशवीचा वापर सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने सोमवारी महाड नगरपरिषदेतील अभियंता श्री परेश साळवी व कर्मचारी पथक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री संदीप सोनवणे यांच्यातर्फे व्यापारी आस्थापनांची पाहणी करण्यात आली.

यामध्ये शहरातील एका घाऊक विक्रेत्याकडे ८३५ किलो प्लॅस्टिक पिशव्याचा साठा जप्त करण्यात आला व दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे महाड शहरात पूर्ण प्लॅस्टिक बंदी करण्याचा प्रशासनाने निश्चय केलेला असून नागरिकांनी प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करू नये असे आवाहन महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. महादेव रोडगे यांनी केले असून नागरिकही प्लॅस्टिक बंदीला उत्तम प्रतिसाद देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!