आरोग्य व शिक्षण

आराठी-श्रीवर्धन” येथे जे.एस.एस. रायगडची “स्वच्छता व स्वच्छता जनजागृती  

रोहा प्रतिनिधि अक्षता जमकर

जन सामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्य विषयक जन जागृती, कौशल्य विकास उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने जन शिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून *दि. 18 जुलै 2026* रोजी “आराठी-श्रीवर्धन” येथे परिसराची स्वच्छता करण्यात आली व स्वच्छता जनजागृती करण्यात आली, तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. अक्षता जामकर यांच्या माध्यमातून स्वछ्तेची शपथही देण्यात आली.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ. रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात जे. एस. एस. रायगड च्या माध्यमातून 15 जुलै ते 31 जुलै 2026 या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता पखवाडा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉ. विजय कोकणे यांनी दिली आहे. ”कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार” यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्ष पासून सक्रिय पणे सुरु आहे व आता पर्यंत 80 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. याच स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून “आराठी-श्रीवर्धन” येथे “स्वच्छता व स्वच्छता जनजागृती” करण्यात आली या उपक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. अक्षता जामकर, प्रशिक्षिका सौ. अरुणा धर्माधिकारी व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!