शहर

गणेशोत्सवाची श्रीवर्धनमध्ये धूम: हिरे-मोत्यांच्या दागिन्यांनी नटले लाडके बाप्पा; बाजारपेठा सजल्या

 

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर 

 

श्रीवर्धन : गणेशोत्सवासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने श्रीवर्धन शहर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. सोमवारी होणाऱ्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी श्रीवर्धन सज्ज झाले असून, घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक मंडळांची अंतिम टप्प्यातील लगबग शिगेला पोहोचली आहे. शहरात सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मूर्तींना हिरे-मोत्यांचा आकर्षक साज

या वर्षीच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तींना चढवण्यात आलेला हिरे-मोत्यांचा साज! मूर्तिकार आणि सजावटकारांनी विविध रंगसंगतीसोबतच मुकुट, हार आणि नयनरम्य अलंकारांचा वापर करून मूर्तींचे रूप अधिकच मनमोहक बनवले आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या या कामांमुळे बाप्पाचे रूप अत्यंत सुंदर आणि भक्तांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमधील मुख्य बाजारपेठा विविध वस्तूंच्या दुकानांनी सजल्या आहेत. सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, सुगंधी फुले, हार आणि इतर साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत तुफान गर्दी केली आहे.

सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशभक्तांकडून मूर्ती आणण्याची आणि मखरांची अंतिम तयारी पूर्ण केली जात असून, शहरात उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!