महाड विश्रामगृहात ओबीसी कमिटीची बैठक संपन्न; सर्व कमिटींनी एकत्र येऊन जोमाने काम करण्याचा निर्धार

प्रदीप सोडकर / महाड शहर
महाड: शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाड येथील विश्रामगृहात ओबीसी कमिटीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात पार पडली.
सदर बैठकीमध्ये सर्व ओबीसी कमिटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन आगामी काळात अधिक जोमाने आणि प्रभावीपणे कार्य करण्याचा मुख्य हेतू स्पष्ट करण्यात आला. समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच ओबीसी घटकांच्या हितासाठी सर्व कमिटींनी एकमेकांशी समन्वय साधून संघटितपणे काम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस ओबीसी कमिटीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी आपापले विचार व सूचना मांडल्या. एकत्र येऊन काम केल्यास संघटनेची ताकद वाढेल आणि सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.



